मुंबई – महाराष्ट्रातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ शासकीय तांत्रिक विद्यालये यांमध्ये राज्यशासन संविधान मंदिरे उभारणार आहे. यामध्ये संविधान उपक्रम राबवला जाणार असून १५ ऑगस्ट या दिवशी या उपक्रमाचे एकाच वेळी ऑनलाईन उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना राज्यघटनेचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिकवण दिली जाणार आहे. यासह विविध स्पर्धांचे आयोजन येथे केले जाईल, अशी माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये ‘४०० हून अधिक जागा प्राप्त झाल्यास भाजप राज्यघटना पालटणार’ या विरोधकांनी केलेल्या प्रचाराचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये, यासाठी महायुतीकडून हा उपक्रम राबवला जात असल्याचे म्हटले जात आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यशासन ‘संविधान मंदिरे’ उभारणार !
सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यशासन ‘संविधान मंदिरे’ उभारणार !
नूतन लेख
- मेघालयाचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- सांगली येथील सांभारे श्री गणेशमूर्तीची १७ सप्टेंबरला मिरवणूक !
- गोव्यात मागील ४ वर्षांत चोरट्यांनी ५८ धार्मिक स्थळांना केले लक्ष्य !
- पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागाला कुळे-शिगाव आणि मोले पंचायत यांचा विरोध
- जळगाव येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणावर आक्रमण
- बजरंग दलाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर गणेशोत्सव मंडळाने विडंबनात्मक श्री गणेशमूर्तीचे केले विसर्जन !