अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दौंड येथील स्टेट बँकेतील खाती गोठवली !

दौंड (पुणे) – ऑनलाईन खेळ आणि जुगारासाठी दौंड येथील स्टेट बँक शाखेत चालू खाते उघडून खात्यातील रकमेतून अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी बँकेतील ८४ खाती गोठवली आहेत. जुगार खेळणार्‍या टोळीने बँकेच्या अधिकार्‍यांशी संगनमत करून कागदोपत्री व्यवसाय करत असल्याचे दाखवून ही खाते उघडली होती. दौंड शाखेत १ ऑक्टोबर २०२३ ते २१ मार्च २०१४ या कालावधीत ८४ चालू खाती उघडण्यात आली होती. भाजी विक्री, भंगार खरेदी विक्री, पानपट्टी, कापड दुकान, केश कर्तनालय, घरगुती उद्योग आदी व्यवसाय दाखवून ही खाती उघडली होती.

या खात्यांमध्ये १ ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमा गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत जमा झाल्या होत्या. दौंड येथील टोळीने खातेदारांकडून या रकमा काढून स्वतःजवळ घेतल्या. १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार या खात्यांमधून झाले होते. ऑनलाईन खेळ आणि मटका जुगारासाठी या खात्याचा उपयोग केला. त्यानंतरही ८४ संशयास्पद बँक खाती गोठवली आहेत.