३४१ मृतदेहांचे आतापर्यंत शवविच्छेदन !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – वायनाड येथील भूस्खलनाच्या पाचव्या दिवशी प्रशासनाने साहाय्यकार्यात ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले. भूस्खलनाच्या दुर्घटनेतील ३४१ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे, असे प्रशासकीय अधिकार्यांनी सांगितले.
वायनाडमध्ये २९ जुलैच्या रात्री भूस्खलनाच्या ४ घटना घडल्या होत्या. यामध्ये चार गावे वाहून गेली. पीडित लोकांना ९१ छावण्यांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. या छावण्यांमध्ये १० सहस्रांहून अधिक लोक रहात आहेत. सैन्यदलाचे मेजर जनरल व्ही.टी. मॅथ्यू यांनी सांगितले की, मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुळा गावांत बचावकार्य पूर्ण झाले आहे. आता केवळ मृतदेहांचा शोध चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यावर साहाय्यताकार्य करण्यास सक्षम असणारे प्रशासन आणि यंत्रणा भारताकडे नाही, हे भारताला लज्जास्पद ! |