कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फुटांपर्यंत !
सांगली, ३ ऑगस्ट (वार्ता.) – कोयना परिसरात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसाची चेतावणी आणि वाढीव विसर्ग यांमुळे सांगली येथे पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २ ऑगस्टच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाण्याची पातळी ३९ फूट ९ इंच होती, तर मिरज येथील कृष्णा घाटावर पाण्याची पातळी ५२ फूट ८ इंच होती. कालच्या तुलनेत आज पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (धोक्याची सूचना), तर ४ ऑगस्ट या दिवशी ‘रेड अलर्ट’ (अतीवृष्टीचा अंदाज) दिला आहे. सध्या कोयना धरणातून ५२ सहस्र १०० क्युसेकने विसर्ग होणार आहे.