वैष्णोदेवीभक्तांवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा !

बजरंग दलाची उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्मविरोधी विधाने करणे हे अज्ञानदर्शक नसून हा धर्मद्रोहच !

‘धर्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. असे असतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्माविरुद्ध विधाने करणे केवळ अज्ञानदर्शक नसून तो धर्मद्रोह आहे. एखाद्या शाळेतल्या मुलाने पदवीधरावर त्याच्या ज्ञानासंदर्भात टीका करावी, असे ते आहे !’

भारतातील हिंदू असे कधी करणार ?

ब्रिटनमध्ये ३ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या संदर्भात येथील हिंदु संघटनांनी एक मागणीपत्र प्रकाशित केले असून त्यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यासह शाळांमधून हिंदु धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १०,६८८ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.६.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे.

संपादकीय : आंध्रप्रदेशसमोरील आव्हाने !

विकासासमवेत चंद्राबाबू नायडू यांनी हिंदुहिताला प्राधान्य देऊन राज्यकारभार करावा, हीच हिंदूंची अपेक्षा आहे !

‘संडे हो या मंडे…’

हिंदु समाज निद्रिस्त आणि सहिष्णू असल्यामुळेच साम्यवादी अधर्मियांनी त्यांच्यावर वर्चस्व गाजवले अन् त्यामुळे आता त्यांची इतकी हानी झाली आहे की, ती भरून काढता काढता मोठी वैचारिक घुसळण होत आहे.

जंगलातील आगीच्या घटना आणि वनसंवर्धनाची आवश्यकता !

जंगलांमुळे देशात चांगली पर्जन्यवृष्टी होऊन प्रदूषण नियंत्रित रहाते. त्यामुळे जंगलांमध्ये आगी लागू नयेत, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सज्जन आणि दुर्जन यांचा स्वभाव

दुर्जन मनुष्य मातीच्या मडक्यासारखा सहजच फुटून जातो आणि मग त्याचे जुळणे कठीण असते. सज्जन मनुष्य सोन्याच्या कलशासारखा असतो, जो तुटू शकत नाही आणि तुटला तरी शीघ्र जुळू शकतो.

विश्वशांतीसाठी आत्मज्ञानी संतांना प्रार्थना !

‘हे आत्मज्ञानी सद्गुरूंनो ! हे निर्दोष नारायणस्वरूप संतांनो !आम्ही आपल्या कृपेचेच आकांक्षी आहोत. दुसरा काही उपाय नाही. आता न सत्तेमुळे विश्वाची अशांती दूर होईल, न अक्कलहुशारीने आणि न शांतीदूतांच्या साहाय्याने. केवळ आपल्या अहैतुकी कृपेचा वर्षाव व्हावा !’