विश्वशांतीसाठी आत्मज्ञानी संतांना प्रार्थना !

‘हे महापुरुषांनो ! विश्वात आपल्या कृपेचा वर्षाव लवकर आणि पुनःपुन्हा होवो. विश्व अशांतीच्या आगीत जळत आहे. त्याला कुठलेही सरकार किंवा कायदा वाचवू शकत नाही.’

‘हे आत्मज्ञानी सद्गुरूंनो ! हे निर्दोष नारायणस्वरूप संतांनो !आम्ही आपल्या कृपेचेच आकांक्षी आहोत. दुसरा काही उपाय नाही. आता न सत्तेमुळे विश्वाची अशांती दूर होईल, न अक्कलहुशारीने आणि न शांतीदूतांच्या साहाय्याने. केवळ आपल्या अहैतुकी कृपेचा वर्षाव व्हावा !’

संतांच्या कृपेचा वर्षाव स्वीकारण्यासाठी मानवाची सिद्धता हवी

त्यांच्या कृपेचा वर्षाव तर होतच आहे. हे बघायचे आहे, ‘आपण आपले हृदयरूपी पात्र किती उघडे ठेवतो ? आपण ती कृपा प्राप्त करण्यासाठी किती उत्सुकता दाखवतो ?’ जसे गाढव चंदनाचा भार तर वाहून नेते; परंतु त्याच्या सुवासापासून वंचित रहाते, तसेच आपण मनुष्यपणाचा भार तर वाहून नेतो; पण मानवतेचे जे सुख मिळायला हवे, त्यापासून आपण वंचित रहातो.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)