‘संडे हो या मंडे…’

‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ हे ‘स्लोगन’ (संबंधित गोष्टीचे अत्यंत मोजक्या शब्दांत अचूक वैशिष्ट्य सांगणारी आकर्षक ओळ) असलेले विज्ञापन आपण सर्वजण अगदी लहानपणापासून पहात आलो आहोत. यमक जुळवले गेल्याने ते लोकांच्या मनावरही बिंबले. इतकी वर्षे या विज्ञापनातील ओळी ऐकतांना आपल्याला काही वाटले नाही; परंतु साम्यवादी, पुरोगामी, काँग्रेस, निधर्मी आणि या सर्वांच्या आधीन गेलेले कला अन् साहित्य जगत यांचे एक व्यापक हिंदु धर्मविरोधी षड्यंत्र काळानुसार जसजसे उघडे पडत गेले, त्या पार्श्वभूमीवर या विज्ञापनाचे हे बोल मात्र आता निश्चित खटकत आहेत. अर्थात् हिंदु समाज निद्रिस्त आणि सहिष्णू असल्यामुळेच साम्यवादी अधर्मियांनी त्यांच्यावर वर्चस्व गाजवले अन् त्यामुळे आता त्यांची इतकी हानी झाली आहे की, ती भरून काढता काढता मोठी वैचारिक घुसळण होत आहे.

अंडी खाणारे किंवा मांसाहार करणारे बहुतांश हिंदू हे काही ठराविक वारांना मांसाहार करतात. काही जण याला अपवाद असले, तरी बहुतांश कुटुंबांमध्ये आवर्जून हे वार पाळले जातात. हिंदु धर्मातील हे एक छोटेसे बंधन मानवाला किती उपयुक्त आहे, हे लक्षात येते. या निमित्ताने हिंदू तमोगुणी मांसाहारापासून दूर रहातात आणि तुलनेत सात्त्विक शाकाहारी आहार घेतात. आज विदेशात शाकाहाराचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला जात आहे. असेही म्हटले जाते की, ज्याने मांसाहार करणे अपेक्षित आहे, त्याला देवाने उपजत तशी नखे आणि दात दिलेले असतात. माणसाला तसे नसल्याने त्याने शाकाहार करणे अपेक्षित आहे. वरील प्रकाराच्या विज्ञापनातील शब्दरचनेमुळे ‘रविवार किंवा सोमवार कुठलाही वार असू दे, अंडे खा’, असेच मनावर बिंबवले जाते. या विज्ञापनातील पुढची ओळ आहे, ‘रोज खाओ अंडे’, म्हणजे ‘आठवड्यातील प्रत्येक वारी ते खा’, असेही त्यातून अभिप्रेत आहे. हे विज्ञापन गैरसरकारी आस्थापनाचे आहे. अर्थात् कुठलेही आस्थापन हे त्याच्या उत्पादनाची अधिकाधिक विक्री होण्यासाठीच विज्ञापने सिद्ध करते आणि तो त्यांचा अधिकारही आहे; परंतु त्यामध्ये आपण कळत नकळत धार्मिक जाणिवांना किंवा नियमांना धक्का लागला आहे, हे हिंदूंच्या लक्षातही येत नाही; कारण त्यांच्याच धार्मिक जाणिवा संवेदनाविहीन आहेत.

विचार करा, जर मुसलमानांचा एखादा धार्मिक नियम उल्लंघन करणारे एखादे विज्ञापन प्रसारित झाले असते, तर समाजातून किती तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असत्या; या प्रतिक्रियांनी हिंसक रूप धारण करून संबंधित आस्थापनाला, ते दाखवणार्‍यांना सर्वांनाच क्षमा मागायला लावून हानीभरपाई घेतली असती; मात्र हिंदूंना स्वधर्मातील कुठल्याही बंधनांचे त्यांच्या जीवनाला हितकारक असणारे महत्त्व लक्षात येत नसल्याने असे काही होत नाही !

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.