वैष्णोदेवीभक्तांवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा !

बजरंग दलाची उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !

बजरंग दलाच्या वतीने निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मिरज, १२ जून (वार्ता.) – ९ जून या दिवशी जम्मू-काश्मीरमधील श्री वैष्णोदेवी दर्शन मार्गावर (कटरा ते खोडी) देवीभक्त हिंदु भाविकांच्या बसवर इस्लामी जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड आक्रमणात १० निष्पाप हिंदु यात्रेकरूंचे बलीदान झाले.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ आणि संपूर्ण हिंदु समाजात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड आक्रमणाचा जाहीर निषेध, तसेच आतंकवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी केंद्रशासनाकडून निर्णायक आणि कठोर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले. उपविभागीय अधिकार्‍यांच्या वतीने वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक हसन निडोणी यांनी हे निवेदन स्वीकारले.

निवेदन दिल्यानंतर कार्यालयाबाहेर घोषणा देतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव, मिरज तालुकाप्रमुख श्री. परशुराम नाईक, सर्वश्री ओंकार हिरगुडे, अमोल वाघमोडे, शंकर जाधव, महेश सूर्यवंशी, अजय गोसावी, संदीप नाईक आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदु भाविकांवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना धडा शिकवा !- बजरंग दल

कोल्हापूर – वरील स्वरूपाच्या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना १२ जून या दिवशी देण्यात आले. या वेळी विभाग संयोजक श्री. सुरेश रोकडे, विश्व हिंदु परिषद जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील, बजरंग दल शहर संयोजक श्री. अक्षय ओतारी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, सर्वश्री योगेश केरकर, उत्तम सांडुगडे, निखिल उलपे, अर्जुन आंबी, योगेश भाट, संतोष कुंभार उपस्थित होते.

इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी एकत्र आलेले विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांचे कार्यकर्ते
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – याच मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून इचलकरंजी येथे देण्यात आले. या प्रसंगी शहरमंत्री श्री. प्रवीण सामंत, जिल्हामंत्री श्री. सुजित कांबळे, सर्वश्री सोमेश्वर वाघमोडे  मुकेश चोथे, नीलेश शिंदे, सर्जेराव कुंभार, माळसाकांत कवडे, अरविंद शर्मा, बाळकृष्ण तोतला यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.