सज्जन आणि दुर्जन यांचा स्वभाव

मृद्घटवत् सुखभेद्यो दुःसन्धानश्च दुर्जनो भवति ।
सुजनस्तु कनकघटवद्दुर्भेद्यश्चाशु सन्धेयः ।।

– हितोपदेश, मित्रलाभ : ९२

अर्थ : दुर्जन मनुष्य मातीच्या मडक्यासारखा सहजच फुटून जातो आणि मग त्याचे जुळणे कठीण असते. सज्जन मनुष्य सोन्याच्या कलशासारखा असतो, जो तुटू शकत नाही आणि तुटला तरी शीघ्र जुळू शकतो.

नारिकेलसमाकारा दृश्यन्ते हि सुहृज्जनाः ।
अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहराः ।।

– हितोपदेश, मित्रलाभ : ९४

अर्थ : सज्जन पुरुष नारळासारखे दिसतात, अर्थात् वरून कठोर आणि आतून कोमल (मृदू) अन् गोड ! दुर्जन लोक बोरासारखे फक्त बाहेरूनच मनोहर असतात. (आतून कठोर हृदयाचे असतात.)