अंकले (जिल्हा सांगली) येथे २० जणांना जेवणातून विषबाधा !

कार्यक्रमात पुरणपोळी आणि आमरस यांचे जेवण दिले होते. या जेवणानंतर २० जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्या

मिरज येथे महापालिकेने ३ धोकादायक घरे पाडली !

बुधवार पेठ, स्वामी वाडाजवळील एका घराची जुनी कमान जेसीबीच्या साहाय्याने पाडली, तसेच इसापुरे गल्ली येथील २५ वर्षांपूर्वीचे जुने पडके घर पाडण्यात आले.

झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तळोदा आणि नंदुरबार येथे केली आहे.

जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपीला किती काळ एकांतात ठेवणार ?

पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये वर्ष २०१० मध्ये घडलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपी हिमायत बेग जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला किती काळ एकांतात ठेवणार ?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक कारागृह प्रशासनाकडे केली आहे

पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून पालखी मार्गांची पहाणी !

पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. दोन्ही पालख्यांचे आगमन पुणे शहरात ३० जून या दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गांची पहाणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी !

बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

सिद्धगिरी मठाची राजकीय हेतूने अपकीर्ती करून षड्यंत्र रचणार्‍यांवर कारवाई करा !

आध्यात्मिक व्यासपिठाचा एक भाग म्हणून २० मे या दिवशी विश्व हिंदु परिषदेने  सिद्धगिरी मठावर ‘संत संमेलन’ घेण्याची इच्छा प्रकट केली.

एस्.टी. महामंडळाच्या पुणे विभागातून यंदा आषाढी यात्रेसाठी २८० हून अधिक एस्.टी. बस सेवा !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (‘एस्.टी.’कडून) प्रतिवर्षी आषाढी वारीनिमित्त जादा बस गाड्या सोडण्यात येतात. यंदाही पुणे विभागातील विविध आगारांतून २८० हून अधिक बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण न केल्यास आंदोलन करू ! – सत्यजित पाटील, सरचिटणीस, भाजप

सत्यजित पाटील म्हणाले की, ६ महिन्यांत जे काम अपेक्षित होते, ते काम वर्ष झाले, तरी अपूर्ण आहे. सांगलीसह विटा गावापर्यंतच्या सर्व नागरिकांचे या पुलाअभावी हाल होत आहेत.

हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करणार्‍या जिहादी प्रवृत्तीचा बीमोड करण्याची आवश्यकता ! – तेजस पाटील, जिल्हा सहसंयोजक, बजरंग दल

हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करणार्‍यांचा धर्म कोणता आहे ? हे वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे आता अशा जिहादी आतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानला नष्ट करून जिहादी प्रवृत्तीचा बीमोड करण्याची वेळ आली आहे.