सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रथम भेटीतच भावावस्था अनुभवणारे मडगाव, गोवा येथील होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर !

मडगाव, गोवा येथील होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या वैयक्तिक भेटीच्या वेळी त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

इतर साधनामार्गांपेक्षा भक्तीयोगाचे समाजासाठीचे योगदान अधिक  !

इतर साधनामार्गातील संतांच्या तुलनेत भक्तीमार्गातील संतांचे भक्त आणि शिष्य यांची संख्या अधिक असते. त्यामुळे भक्तीमार्गी संतांनीच खर्‍या अर्थाने समाजाच्या उद्धारासाठी अधिक कार्य केलेले आहे.

मालवण येथे गटाराच्या बांधकामासाठी ७ दिवस रस्ता बंद

पावसाळा चालू झाल्यावर गटार बांधणे; म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखेच !

कला अकादमीनंतर आता गोवा विधानसभेच्या छताला गळती

विधानसभा इमारतीच्या छताला अनेक ठिकाणी पुन्हा गळती लागली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गळती रोखण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्चून ‘वॉटर प्रूफ्रिंग’चे काम (पाणी झिरपण्यापासून रोखण्याचे काम) हाती घेतले आहे..

वागातोर येथे रात्री होणार्‍या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना मोठ्या आवाजातील ध्वनी ऐकू येत नाही कि ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करतात ?

आग वेगाने पसरल्याने कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही !

इमारतीच्या तळमजल्यावरील स्वयंपाकघरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण खर्चात १५ टक्के वाढ !

जनतेला खाण्यासाठी अन्न मिळणे कठीण झाले असतांनाही पाकचे सरकार सैन्यावरील खर्चात मात्र वाढ करते आणि तेथील जनता ते स्वीकारते. यावरून पाकची मानसिकता लक्षात येते !

वक्फ मंडळाला १० कोटी रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत हिंदूंचीही मते गमावणार का ?

वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी रुपये देऊन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूंचीही मते गमावणार आहात का ?, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करणारा व्हिडिओ अभिनेत्री केतकी चितळे यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.  

मालाड (मुंबई) येथे ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा !

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करायला हवी ! यासह असे आईस्क्रीम विकणार्‍या ‘यम्मो’ आस्थापनावरही बंदी आणायला हवी !

नागपूर येथे ‘पबजी’च्या नादात तरुणाचा पंप हाऊसच्या पाण्यात बुडून मृत्यू !

भ्रमणभाषमधील खेळांच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार्‍या तरुण पिढीला पालकांनी दिशा देणे आवश्यक ! पालकांनी ‘पबजी’च्या अतिरेकाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपल्या मुलांना वेळीच सतर्क करावे !