वाशी येथे निषेधासाठी हिंदू संघटित !
नवी मुंबई, १३ जून (वार्ता.) – हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करणार्यांचा धर्म कोणता आहे ? हे वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे आता अशा जिहादी आतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानला नष्ट करून जिहादी प्रवृत्तीचा बीमोड करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील यांनी येथे केले. जम्मू-काश्मीर येथे यात्रेकरूंवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा विहिंप आणि बजरंग दल यांच्या वतीने वाशी येथे तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ठाणे विभाग संयोजक सूरज तिवारी, नवी मुंबई भाजपचे पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आतंकवाद्यांची हिरवी कीड नष्ट करण्याची वेळ आली आहे ! – शंकर संगपाळ, बजरंग दलाचे पदाधिकारी
हिंदूंनी आता जातींमध्ये न विभागता हिंदु म्हणून एकत्र यायला पाहिजे. आतंकवादी हे आक्रमण करतांना जात न बघता केवळ हिंदु म्हणूनच पहातात. त्यामुळे आता आतंकवाद्यांची ही हिरवी कीड नष्ट करण्याची वेळ आली आहे.
जिहादी आक्रमण आपल्या दारापर्यंत आले आहे ! – स्वरूप पाटील, प्रखंड मंत्री, विश्व हिंदु परिषद, बेलापूर
जोपर्यंत हिंदु हे कट्टर हिंदु होत नाहीत, तोपर्यंत अशी आक्रमणे होत रहातील. जिहादी केवळ हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करतात; मात्र हज यात्रेवर आक्रमण का करत नाहीत, असा प्रश्न कधी निधर्मीवाद्यांना पडत नाही. काही वर्षांपूर्वी ‘रझा अकादमी’च्या लोकांनी मुंबईमध्ये पोलिसांवर आक्रमण केले होते. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे कार्यालय नवी मुंबईतील सीवूड येथे उद्ध्वस्त करण्यात आले. थोडक्यात काय, तर जिहादी आक्रमण आपल्या दारापर्यंत आले आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटित होण्याची वेळ आली आहे.
हिंदूंनी संघटित व्हावे ! – सुरेश सिंह राणा, बजरंग दलाचे पदाधिकारी
जिहादींचे भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे १ सहस्र ४०० वर्षांपासूनचे स्वप्न आहे; पण ते कधीही पूर्ण होणार नाही. आपण जात-प्रांत यांमध्ये विखुरले आहोत. आपण संघटित झाले पाहिजे.
हिंदूंच्या यात्रेवर आक्रमण केल्यास मुसलमानांना हज यात्रेला जाऊ देणार नाही ! – सर्वेश सिंह राणा
भारतात राहून पाकिस्तानची काळजी असलेले मुसलमान ४८ घंट्यांत पाकिस्तानात गेले नाहीत, तर त्यांना घरात घुसून बाहेर काढू. यापुढे आमच्या यात्रेवर आक्रमण केले, तर त्यांनाही हज यात्रेला जाऊ देणार नाही.