राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी !

सौ. सुनेत्रा पवार

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी १३ जून या दिवशी विधानभवनात येऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत होते. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार आहेत.