छत्रपती संभाजीनगर येथे काळ्या फिती लावून शिक्षकांचे आंदोलन !

शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘शिक्षक समिती’ स्वत:च्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करत आहे. काळ्या फिती लावून पहिल्या दिवशी निषेध व्यक्त करण्यात आला. 

आजपासून मुंबईत मुसळधार पाऊस ! – माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामान तज्ञ

ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी १८ जूनपासून मुंबईत मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. १८ ते २५ जूनपर्यंत मुंबईसह उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल. 

(म्हणे) ‘द्वेषपूर्ण वक्तव्य करून भावना भडकावणार्‍यांची यंत्रणांनी नोंद घ्यावी !’ – इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस

वक्फ मंडळाला दिलेल्या निधीविषयी मराठी अभिनेत्री केतळी चितळे हिने केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

वारकरी दिंड्यांना अनुदान देण्यासाठी माहिती संकलिक करण्याचे काम चालू ! – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना आध्यात्मिक आघाडी

राज्यातील नोंदणीकृत दिंड्यांना राज्यशासनाने २० सहस्र रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंत्रालय स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे.

येरवडा (पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न !

उद्दाम धर्मांधांना कशाचेच भय नसल्याचे हे द्योतक आहे !

सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू ! – शंभूराज देसाई, सीमा समन्वयक मंत्री

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयात जो प्रलंबित दावा आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र सरकार लक्ष ठेवून आहे आणि कृतीही करत आहे.

अमळनेर (जळगाव) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण !

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत समन्वय ठेवल्यास पूर टाळणे शक्य ! – पूर परिषद

महाराष्ट्रातील कोयना धरणातून बाहेर पडणारे पाणी आणि कर्नाटक येथील आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग यांवर नियंत्रण ठेवावे, तसेच महाराष्ट्र अन् कर्नाटक राज्यांत समन्वय ठेवल्यास पूर टाळणे शक्य आहे, असे मत नृसिंहवाडी येथील पूर परिषदेत व्यक्त करण्यात आले.

जुन्नर (पुणे) येथील खुबी गावाजवळ ७४ म्हशींची सुटका, ६ धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता सांगणारी घटना !

बुद्धीप्रामाण्यवादी खरंच “बुद्धीप्रामाण्यवादी” आहेत ?

‘त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी, वकील वकिलांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ?’