येरवडा (पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न !

महिला आणि नागरिक यांनाही शिवीगाळ अन् मारहाण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येरवडा येथील नागपूर चाळ भागात १६ जून या दिवशी ३० ते ४० जणांच्या धर्मांधांच्या गटाने हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी परिसरातील इतर महिला आणि नागरिक यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे धर्मांध रस्त्यावर ३० बोकड घेऊन शर्यत लावत होते. तेथे अनेक लहान मुलेही खेळत होती. त्यामुळे रवि विश्वकर्मा यांनी धर्मांधांना ‘अशी शर्यत लावल्यास इतर मुलांना इजा होईल’, असे सांगून हटकले. यावर सुफियान सय्यद याने विश्वकर्मा यांना उलट बोलून मारहाण करणे चालू केले.

संपूर्ण जमावाने सर्वश्री रवि विश्वकर्मा, भारत विश्वकर्मा, दिनेश विश्वकर्मा, सुखराम विश्वकर्मा आणि सौ. शोभा विश्वकर्मा यांच्यावरही आक्रमण केले. लोखंडी रॉड, दगड, विटा, सायकल आदींचा शस्त्र म्हणून वापर करत त्यांनी कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.  उपस्थित इतर महिला आणि नागरिक यांनी विश्वकर्मा कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांधांनी त्यांनाही मारहाण आणि शिवीगाळ केली. सौ. शोभा विश्वकर्मा या वृद्ध महिलेला जमावाने लोखंडी रॉडने जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. धर्मांधांच्या जमावाने ‘आज यांना मारून टाकायचे, कापून टाकायचे’, अशा मोठमोठ्याने धमक्याही दिल्या.

मारहाण चालू केलेला सुफियान सय्यद हा एक शाळकरी मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी शाळेमध्येही त्याने एका हिंदु मुलाला अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) ही घोषणा देण्यास बळजोरी करून मारहाण केली होती, तसेच शाळेमध्येही दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.

संपादकीय भूमिका :

उद्दाम धर्मांधांना कशाचेच भय नसल्याचे हे द्योतक आहे !