वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आध्यात्मिक आघाडी सातत्याने प्रयत्नरत

कोल्हापूर – राज्यातील नोंदणीकृत दिंड्यांना राज्यशासनाने २० सहस्र रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंत्रालय स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे. लवकरात लवकर आषाढी चालू होण्याच्या पूर्वी हे अनुदान वारकर्यांना मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आध्यात्मिक आघाडी सातत्याने प्रयत्न करत असून वारीच्या कालावधीत गरीब, शेतकरी वारकर्यांना या अनुदानाचा निश्चित लाभ होईल. गतवर्षीही आषाढी वारीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे जाऊन तेथील कामांचा आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या. यंदाही वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी माहिती शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी दिली.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !