सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू ! – शंभूराज देसाई, सीमा समन्वयक मंत्री

शंभूराज देसाई यांना निवेदन देतांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते

बेळगाव – कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयात जो प्रलंबित दावा आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र सरकार लक्ष ठेवून आहे आणि कृतीही करत आहे. या संदर्भात अधिवेशनात चर्चा करून त्यावर मार्ग काढला जाईल. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी जुलै महिन्यात मुंबई येथे यावे. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचे सीमा समन्वयक आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री देसाई यांची भेट घेतली. त्या वेळी देसाई यांनी हे आश्वासन दिले.

कर्नाटकच्या सीमेवरील शिनोळी या गावात शेतकर्‍यांच्या मालासाठी निर्यात साठाकेंद्र स्थापन करावे आणि शिनोळी येथील सीमाकक्षाचे उद्घाटन त्वरित करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन समितीच्या वतीने या वेळी सादर करण्यात आले.