जुन्नर (पुणे) येथील खुबी गावाजवळ ७४ म्हशींची सुटका, ६ धर्मांधांना अटक

प्रतिकात्मक चित्र

जुन्नर (पुणे) – तालुक्यातील खुबी परिसरामध्ये ५ आयशर टेंपो भरून ७४ म्हशींची कोणतीही अनुमती न घेता वाहतूक केली होती. या टेंपोंवर कारवाई करण्यात आली आहे. टेंपोंमध्ये म्हशी दाटीवाटीने भरल्याने २ म्हशींचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा नोंद केला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. टेंपोचालक महंमद खान, तोहीत कुरेशी, उस्मानखान, रशीद शेख, फिरोज मलिक, फारुक कुरेशी, महंमद बिलाल शेख यांच्यापैकी ६ जणांना कह्यात घेतले आहे.

ओतूर परिसरामध्ये पोलिसांची नाकाबंदी चालू होती. त्या वेळी पोलिसांना ५ टेंपो भरून विनाअनुमती म्हशींची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खुबी गावाजवळ या टेंपोंना कह्यात घेण्यात आले. ७४ म्हशींपैकी जीवंत असलेल्या ७२ म्हशींना गोशाळेमध्ये पाठवले आहे.

संपादकीय भूमिका :

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता सांगणारी घटना !