छत्रपती संभाजीनगर येथे काळ्या फिती लावून शिक्षकांचे आंदोलन !

अशैक्षणिक कामे न लावण्यासाठी आंदोलन

छत्रपती संभाजीनगर – येथील शिक्षक समितीने शिक्षकांवर सोपवण्यात येणार्‍या शाळाबाह्य कामांचा निषेध नोंदवण्यासाठी शिक्षकांनी १५ जून या दिवशी काळ्या फिती लावून आंदोलन केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘शिक्षक समिती’ स्वत:च्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करत आहे. काळ्या फिती लावून पहिल्या दिवशी निषेध व्यक्त करण्यात आला.

‘शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्या. त्यांना इतर कामे लावू नका, यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. ‘आम्ही वारंवार मागणी करूनही आम्हाला अशैक्षणिक कामे दिली जातात’, असे शिक्षक समितीच्या सदस्यांनी सांगितले. (याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ! – संपादक) शिक्षकांनी दिवसभर शाळेत काळ्या फिती लावून काम केले. या मागण्यांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी ‘ड्रेसकोड’ निर्णयाचा विरोध करण्यात आला. आंदोलनात शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, सचिव रंजित राठोड, नितीन नवले, शाम राजपूत सहभागी झाले होते.