मुंबई – ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी १८ जूनपासून मुंबईत मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. १८ ते २५ जूनपर्यंत मुंबईसह उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल.
१८ ते २२ जून या काळात विदर्भ, मराठवाडा, कान्हादेश, तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा येथे मध्यम पावसाची शक्यता आहे, १८ आणि १९ जून हे दोन दिवस कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गोंदिया, गडचिरोली या भागांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवत असल्याचेही ते म्हणाले.