राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १०,६८८ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.६.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे.

संपादकीय : आंध्रप्रदेशसमोरील आव्हाने !

विकासासमवेत चंद्राबाबू नायडू यांनी हिंदुहिताला प्राधान्य देऊन राज्यकारभार करावा, हीच हिंदूंची अपेक्षा आहे !

‘संडे हो या मंडे…’

हिंदु समाज निद्रिस्त आणि सहिष्णू असल्यामुळेच साम्यवादी अधर्मियांनी त्यांच्यावर वर्चस्व गाजवले अन् त्यामुळे आता त्यांची इतकी हानी झाली आहे की, ती भरून काढता काढता मोठी वैचारिक घुसळण होत आहे.

जंगलातील आगीच्या घटना आणि वनसंवर्धनाची आवश्यकता !

जंगलांमुळे देशात चांगली पर्जन्यवृष्टी होऊन प्रदूषण नियंत्रित रहाते. त्यामुळे जंगलांमध्ये आगी लागू नयेत, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सज्जन आणि दुर्जन यांचा स्वभाव

दुर्जन मनुष्य मातीच्या मडक्यासारखा सहजच फुटून जातो आणि मग त्याचे जुळणे कठीण असते. सज्जन मनुष्य सोन्याच्या कलशासारखा असतो, जो तुटू शकत नाही आणि तुटला तरी शीघ्र जुळू शकतो.

विश्वशांतीसाठी आत्मज्ञानी संतांना प्रार्थना !

‘हे आत्मज्ञानी सद्गुरूंनो ! हे निर्दोष नारायणस्वरूप संतांनो !आम्ही आपल्या कृपेचेच आकांक्षी आहोत. दुसरा काही उपाय नाही. आता न सत्तेमुळे विश्वाची अशांती दूर होईल, न अक्कलहुशारीने आणि न शांतीदूतांच्या साहाय्याने. केवळ आपल्या अहैतुकी कृपेचा वर्षाव व्हावा !’

भीतीपेक्षा प्रेमाचा धाक असावा !

लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील, तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवतात आणि मग उत्तम रितीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल.

भारतीय संस्कृती, तिने घातलेली बंधने आणि व्यक्तीस्वातंत्र्य !

‘दुसर्‍याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो…

पू. भगवंत कुमार मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. मेनरायकाकांच्या सूक्ष्म रूपाने शिवाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ही पू. मेनरायकाकांची चंदेरी रंगाची ज्योत शिवाच्या हृदयात सामावली गेली.

पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या अंत्यविधीचे सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. मेनराय यांच्या देहातून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. हे सहन न झाल्याने एका वाईट शक्तीने प्रतिक्रिया दिली, ‘हे सनातनवाले आम्हाला नेहमी त्रासच देत असतात !’