सकाळी ११.५० : पू. मेनराय हे सूक्ष्मातून आकाशात ज्योतीस्वरूपात दिसले. ते तेथून स्वतःचा अंत्यविधी पहात होते. तेव्हा ते गुरुस्मरण करत कृतज्ञताभावात होते.
११.५२ : पू. मेनराय यांना स्वतःचा अंत्यविधी चालू असलेल्या ठिकाणी जाण्याची इच्छा नव्हती; कारण ते उच्च सूक्ष्मलोकातच संतुष्ट स्थितीत होते. ते स्वतःच्या अंत्यविधीकडे तटस्थतेने पहात होते.
११.५३ : पू. मेनराय यांच्या स्थूलदेहाभोवती ईश्वराचे पांढर्या रंगाचे संरक्षककवच दिसत होते.
११.५४ : पू. मेनराय यांच्या स्थूलदेहापासून काही अंतरावर सूक्ष्मातून एक पुरुष लिंगदेह दिसला. त्याला एक पाय नव्हता. ‘तो अतृप्त लिंगदेह असून पू. मेनराय यांच्या देहातून प्रक्षेपित होत असलेले चैतन्य प्राप्त करून पुढील गती मिळवण्यासाठी आला आहे’, असे मला जाणवले.
११.५५ : पू. मेनराय यांचे पूर्वज पांढर्या पोशाखामध्ये हा अंत्यविधी पहाण्यासाठी उपस्थित होते.
११.५६ : पू. मेनराय यांच्या स्थूलदेहातून पिवळ्या रंगाचे तेज प्रक्षेपित झाल्याने ते वातावरणात दिसत होते.
११.५७ : पू. मेनराय यांच्या देहातून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. हे सहन न झाल्याने एका वाईट शक्तीने प्रतिक्रिया दिली, ‘हे सनातनवाले आम्हाला नेहमी त्रासच देत असतात !’
११.५८ : पू. मेनराय यांच्या स्थूलदेहाभोवती गुलाबी, पांढर्या आणि निळ्या रंगांचे दैवी कण सूक्ष्मातून दिसत होते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०२४)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |