(म्हणे) ‘मनुस्मृतीतील अनेक श्लोक महिलांविषयी अपमानकारक असल्याने श्लोकांचा समावेश शालेय शिक्षणात घेऊ नये !’

अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जातीयवादाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निषेध करू, असे मत ‘आम आदमी पार्टी, अनुसूचित जाती’चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले. 

अग्रवाल कुटुंबाने ८४ लाख रुपये थकवल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा कातोरे यांचा आरोप !

अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात काही तक्रार असेल, तर ते सांगण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले होते. त्यानुसार आता तक्रारी समोर येत आहेत.

पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या वाटेवर ! – इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, वर्ष १९७१ देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बांगलादेश अस्तित्वात आला होता. आज देशात पुन्हा अशीच स्थिती निर्माण झाल्यामुळे देश पुन्हा विघटनाच्या वाटेवर आहे, अशी चेतावणी कारागृहात बंदीवासात असलेल्या इम्रान खान यांनी दिली आहे.

दुबई आणि अबू धाबी विमानतळांवर भारतीय पर्यटकांसाठी कठोर नियम लागू !

संयुक्त अरब अमिराती सरकारने विमान आस्थापनांनाही ताकीद दिली आहे की, जर त्यांच्या विमानातून अटी पूर्ण  न केलेले पर्यटक आले, तर त्यांना दंड आकारला जाईल.

(म्हणे) ‘पूर्वजांना ५ सहस्र वर्षे त्रास देणार्‍या मनुस्मृतीला विरोध व्हायला हवा !’

कोणताही धर्मग्रंथ जाळणे, हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतांना जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या दहनासंदर्भात असे विधान करणे, हे राज्यघटनाद्रोहीच होय ! पोलिसांना हे दिसत कसे नाही ?

Kejriwal  Wants Additional Bail : अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितला ७ दिवसांचा अतिरिक्त जामीन

जामिनावर असतांना केजरीवाल यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या, तेव्हा त्यांना वैद्यकीय चाचण्या करून घ्यायची आठवण आली नाही का ?’

मंगळुरू (कर्नाटक) येथे भर रस्त्यात नमाजपठणामुळे वाहतुकीला अडथळा  

ही स्थिती संपूर्ण देशांत असतांना यावर स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत कारवाई करण्यात आली नाही आणि येत नाही, हे लज्जास्पद !

Sasoon Doctors  Destroy ‘Blood Sample’ आरोपीचे ‘ब्लड सॅम्पल’ ससून रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी कचर्‍याच्या डब्यात फेकले !

ससूनचे आधुनिक वैद्य अजय तावरे यांच्या आदेशाने आरोपीचे डॉ. श्रीहरी हरलोर यांनी ‘ब्लड सँपल’ घेतले आणि ते ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये पाठवण्याऐवजी दुसर्‍याच व्यक्तीचे ‘ब्लड सँपल’ पाठवले.

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवणे शक्य नाही !’ – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

गेल्या १० वर्षांत काँग्रेस केंद्रात सत्तेत येऊ शकलेली नाही. हिंदूंनी तिला सत्ताच्युत केले आहे. हे जसे शक्य झाले, तसेच हिंदु हे भारताला हिंदु राष्ट्र केल्याखेरीज रहाणार नाहीत, हेही शक्य आहेच !

महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल घोषित !

नियमित, खासगी, अपंग असे सर्व विद्यार्थी मिळून यंदा १६ लाख २१ सहस्र विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांपैकी १५ लाख १७ सहस्र ८०२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत न्यून, म्हणजे ९४.७३ टक्के लागला.