(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवणे शक्य नाही !’ – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपवाले पुन्हा पुन्हा ‘विकसित भारत’ असे म्हणतात; परंतु तो त्यांचा खरा विचार नाही. भारत विकसित होणे त्यांना नको आहे. त्यामागे त्यांचे गुपित आहे, ते म्हणजे देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचे ! हा देश हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही. हा देश बहुधर्मीय राष्ट्र आहे; कारण येथे सर्व धर्मांचे लोक आहेत, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे जवाहरलाल नेहरू यांच्या २७ मे या दिवशी झालेल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात केले.

संपादकीय भुमिका

  • गेल्या १० वर्षांत काँग्रेस केंद्रात सत्तेत येऊ शकलेली नाही. हिंदूंनी तिला सत्ताच्युत केले आहे. हे जसे शक्य झाले, तसेच हिंदु हे भारताला हिंदु राष्ट्र केल्याखेरीज रहाणार नाहीत, हेही शक्य आहेच !
  •  ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, अशी एक म्हण आहे. ती या संदर्भात काँग्रेसला लागू पडते !