डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित करा ! – हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी अधिवक्ता

सरकार पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद ९ मे या दिवशी संपला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे या दिवशी होणार आहे.

Goa Padmashri Award : सावईवेरे (गोवा) येथील शेतकरी संजय पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ प्रदान !

श्री. संजय पाटील यांना यापूर्वी ‘गोवा कृषी रत्न’ पुरस्कार, ‘गोवा बागायतदार’चा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, ‘ईकार- भारतीय कृषी संशोधन संस्थेचा ‘इ.ए.आय्.आर्.’ नावीन्यपूर्णता असलेला शेतकरी पुरस्कार आणि ‘गोवा राज्य जैवविविधता मंडळा’चा पुरस्कार मिळालेला आहे !

Sindhudurg Teacher Recruitment Process : सर्व प्रक्रिया होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरती प्रक्रिया रखडली !

प्रशासनाचा भोंगळ कारभार ! आगामी शैक्षणिक वर्षात तरी शिक्षकांविना मुलांची शैक्षणिक हानी होणार नाही, यासाठी प्रशासन तत्परतेने कृती करणार का ?

Mhadei Water Dispute : ‘म्हादई प्रवाह’ आणि सभागृह समिती यांचे काम धिम्या गतीने – पर्यावरणप्रेमींचे निरीक्षण

म्हादई जलतंटा लवादाने दिलेल्या अंतिम निवाड्यानुसार पाण्याचे वाटप होत आहे कि नाही हे पहाण्याचे दायित्व ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाचे आहे ‘म्हादई प्रवाह’ची आतापर्यंत एकच बैठक झालेली आहे आणि प्रत्यक्षात ‘म्हादई प्रवाह’साठी अजूनही कार्यालय नाही !

NGT Notice Against Pollutuion : राज्यातील प्रदूषणकारी औषधनिर्मिती प्रकल्पांची माहिती द्या ! – राष्ट्रीय हरित लवादाची गोवा शासनाकडे मागणी

औषधनिर्मिती प्रकल्पांच्या प्रदूषणांमुळे जलचर, वन्यजीव, मलनिस्सारण प्रकल्प यांच्यावर परिणाम होणे, पिण्याच्या पाण्याचा दर्जा घसरणे आदी प्रकार आढळल्याने राष्ट्रीय हरित लवाद याविषयी सक्रीय झाला आहे !

अमेरिकेचे स्वार्थांध रूप जाणा !

भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश आहे. तसेच ती भारतावर सातत्याने खोटे आरोप करीत आहे. तिला भारताची राष्ट्रीय मानसिकता आणि इतिहास कळत नाही, असा घणाघात रशियाने अमेरिकेवर केला आहे.

साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

भारतियांनो, साधनेचे हे महत्त्व लक्षात घ्या !

‘हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते !