हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ध्येयनिष्ठ दैनिक ‘सनातन प्रभात’चे २५ व्या वर्षात पदार्पण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीला दिनांकानुसार २४ वर्षे पूर्ण होऊन आज (४ मार्च या दिवशी) दैनिक २५ व्या म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

भारत असे कधी करणार ?

फ्रान्समध्ये मार्चपासून २३ सहस्र घुसखोरांना बाहेर काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. यात सीरिया, इराक, पाकिस्तान, मोरक्को, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त या देशांतील लोकांचा समावेश आहे.

निधन वार्ता !

येथील सनातनचे साधक सुरेश जाखोटिया (वय ६५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचे २ मार्च या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

संपादकीय : अमेरिकेत भारतीय असुरक्षित !

भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा !

मॅकडोनाल्डची भेसळ !

‘अन्नामध्ये भेसळ करणे’ हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. सरकार याचा गांभीर्याने विचार करील, अशी आशा आहे.

गोव्यामध्ये सोसायटी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ची (अभिहस्तांतरण प्रक्रियेची) अनुमती हवी !

सरकारने ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ (अभिहस्तांतरण प्रक्रिया) कायदा संमत केल्यास जनतेचे आशीर्वाद सरकारला मिळतील; परंतु यासाठी सर्व सोसायट्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ‘एकी हेच बळ’, या तत्त्वाने हा विषय नक्कीच सोडवता येईल.’

भगवतीदेवीच्या चरणप्राप्तीचे महत्त्व !

भगवती, मूलाधारात असलेले ५६ किरण, मणिपूरच्या जलतत्त्वातील ५२, स्वाधिष्ठानच्या अग्नितत्त्वातील ६२, अनाहतमधील वायुतत्त्वातील ५४, विशुद्ध चक्रातील आकाशतत्त्वाचे ७२ आणि आज्ञाचक्रस्थ मनस्तत्त्वातील ६४ असे जे तुझे किरण आहेत त्या सर्वांहून तुझे चरणकमलयुगल हे वर आहेत.

हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती.

सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचे प्रतीक म्हणजे अबु धाबी येथील हिंदु मंदिर !

अबु धाबीमध्ये हिंदु मंदिर उभारले जाणे, म्हणजे भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय मूल्याची विश्वात जोपासना करणे होय !