Jharkhand Hanuman Katha Permitted : झारखंड उच्च न्यायालयाकडून ‘हनुमान कथा’ कार्यक्रमाला अनुमती !

राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करून या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती.

CM Yogi Warned : मुलींना छेडाल, तर ‘राम नाम सत्य है’ होईल ! – योगी आदित्यनाथ

कुणी महिलेची छेड काढली, तर पोलीस लगेचच त्याला त्याच्या पुढील चौकात पकडतील, अशी तंबी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मुलींची छेड काढणार्‍यांना दिली. 

Mufti Azhari Arrested : हिंदूंना ‘कुत्रा’ म्हणणारा मुफ्ती अजहरी याला अटक

आतापर्यंत अझहरी यांच्यावर अनेकदा द्वेषयुक्त भाषण केल्याचे आणि असहिष्णूतेला प्रोत्साहन दिल्याचे आरोप झालेले आहेत. वर्ष २०१८ मध्ये कर्नाटक येथेही हिंदूंविरोधी टिपणी केल्याचा गुन्हा त्यांच्यावर अद्याप नोंद आहे. सध्या ते जामिनावर आहेत.

ब्रिटीश खासदार ब्लॅकमन यांनी बीबीसीला संसेदत फटकारले ! (British MP Slams BBC)

बीबीसी भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे. तिला ब्रिटन सरकारकडून निधी मिळतो. सध्या ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचे हिंदु आहेत. त्याचा भारताला आणि हिंदूंना काहीच लाभ होत नाही, हेच यातून दिसून येते !

आगामी निवडणुकीत गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

‘जनसंवाद यात्रे’च्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री ठाकरे ४ फेब्रवारी या दिवशी जिल्हा दौर्‍यावर आले होते. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराजेश्वर’ मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले.

पुढील १६ मासांत कर्करोग रुग्णालय उभारणार ! – आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा (CANCER HOSPITAL In GOA)

राज्यात एक लाख महिलांपैकी २ सहस्र ५०० महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून कर्करोगावरील लस विनाशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबईत साडेतीन लाखांहून अधिक कुटुंबांनी सर्वेक्षणास दिला नकार !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण पडताळण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे.

भूखंड विक्रीची विज्ञापने देणार्‍या ४१ जणांना ‘महारेरा’कडून नोटीस !

राज्यात भूखंड, घरे, इमारती यांच्या विक्रीसाठी ‘महारेरा’ची (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची) नोंदणी आवश्यक आहे. तसे न करता अनेक ठिकाणी भूखंडाचे तुकडे पाडून त्याविषयीची विक्री करण्याचे विज्ञापन दिले जाते.