CM Yogi Warned : मुलींना छेडाल, तर ‘राम नाम सत्य है’ होईल ! – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कुणी महिलेची छेड काढली, तर पोलीस लगेचच त्याला त्याच्या पुढील चौकात पकडतील.

लक्षात ठेवा की, जर कुणी महिलेची किंवा बहिणीची छेड काढली, तर ‘राम नाम सत्य है’ झालेच म्हणून समजा, अशी तंबी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मुलींची छेड काढणार्‍यांना दिली.