भूखंड विक्रीची विज्ञापने देणार्‍या ४१ जणांना ‘महारेरा’कडून नोटीस !

मुंबई – राज्यात भूखंड, घरे, इमारती यांच्या विक्रीसाठी ‘महारेरा’ची (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची) नोंदणी आवश्यक आहे. तसे न करता अनेक ठिकाणी भूखंडाचे तुकडे पाडून त्याविषयीची विक्री करण्याचे विज्ञापन दिले जाते. नोंदणी क्रमांक न मिळूनही विज्ञापने करणार्‍या ४१ लोकांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात मुंबई, पुणे, नागपूर या भागांतील लोकांचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण येथील १३ जण आहेत. पुण्यातील २१ आणि नागपूर येथील ७ जण आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे.

महारेराकडून या भूखंडांच्या प्रकल्पांसाठी इतर इमारतींच्या प्रकल्पांप्रमाणेच आर्थिक, कायदेशीर, तांत्रिक अशी छाननी होते. स्थानिक प्राधिकरण बिगरशेती प्रमाणपत्र, भूखंडांचा आकार, भूखंडाच्या सीमारेषा, भोगवटा प्रमाणपत्र देतांना अन्य आवश्यक घटक पाहून नोंदणी क्रमांक देते.