मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देणारे मुंबई ‘महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४’ संमत !

‘मुंबई आणि अन्य महापालिका यांना एकच कायदा करावा’, या प्रश्नाविषयी उदय सामंत यांनी ‘मुंबई महापालिकेची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या पुढे असल्यामुळे एकच कायदा अन्य महापालिकांना लागू करू शकणार नाही’, असे सांगितले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कंगना रणौत राजकारणात येण्याची शक्यता !; मुंबई-पुणे महामार्गावर महत्त्वाचा पालट !…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेला येणार्‍या रस्त्यावर नवीन बोगदा झाला असल्याने मार्गात पालट करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड !

मुख्यमंत्री सचिवलयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी, तसेच शिक्के असल्याचे सचिवालयाला निदर्शनास आले आहे.

इंग्लंडच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधात इस्लामद्वेषाचा दावा !

इस्लामद्वेषासंदर्भात खासदार ली अँडरसन आणि सुएला ब्रेव्हरमन यांच्या टिप्पण्यांनंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांना आता त्यांच्या पक्षाच्या बचावासाठी पुढे यावे लागले आहे.

अफगाणिस्तान पाकच्या बंदराऐवजी इराणमधील बंदरांतून करू लागला व्यापार !

भारताने इराणमध्ये बांधलेल्या ‘चाबहार’ आणि इराणचा ‘बंदर अब्बास’ या बंदरांचा वापर करून अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार  जगात आयात आणि निर्यात करत आहे.

चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या हत्याकांडाची धमकी दिल्याविषयी सांगली पोलीस ठाण्यात तक्रार !

चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या हत्याकांडाची धमकी दिल्याविषयी ‘संबंधित व्यक्तीवर तात्काळ योग्य ती कारवाई केली जावी’, या मागणीसाठी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

पोरबंदर (गुजरात) किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त !

समुद्री किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्‍या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे.

कोपरगाव (अहिल्यानगर) येथील महाविद्यालयात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावले !

एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !

कुरकुंभ येथील अमली पदार्थ देहलीहून नंतर लंडनला पाठवले !

विमानाने ‘फूड डिलिव्हरी सर्व्हिस’च्या माध्यमातून अमली पदार्थ पाठवण्याची घटना उघडकीस आलेली आहे . या ड्रग्जची किंमत साधारण २८० कोटी रुपये असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथे भारतीय चलनातील ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

चीनमधून ऑनलाईन माध्यमाद्वारे कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापण्यात आल्या असून पोलिसांनी यातील प्रमुख ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.