पोलिसांच्या अन्वेषणातून उघड !
पुणे – कुरकुंभ येथील अमली पदार्थ (ड्रग्ज) प्रथम देहली आणि नंतर लंडनमध्ये पाठवण्यात आले, ही माहिती पोलीस अन्वेषणातून उघड झाली आहे. हे अमली पदार्थ विमानाने ‘फूड डिलिव्हरी सर्व्हिस’च्या माध्यमातून पाठवण्यात आले. देहलीतून १४० किलो ‘एम्डी’ या अमली पदार्थाची लंडनमध्ये तस्करी करण्यात आली होती. या ड्रग्जची किंमत साधारण २८० कोटी रुपये आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली असून देहलीतून पुणे पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. या साखळीतील सनी उपाख्य संदीप धुनिया याचे छायाचित्रही पोलिसांच्या हाती लागलेले आहे. त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस काढण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकादेशाच्या राजधानीतही आमली पदार्थांचे इतके मोठे जाळे पसरले असणे , हे लज्जास्पदच ! |