दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कंगना रणौत राजकारणात येण्याची शक्यता !; मुंबई-पुणे महामार्गावर महत्त्वाचा पालट !…

कंगना रणौत राजकारणात येण्याची शक्यता !

कंगना रणौत

मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत राजकारणात येणार असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या काही वर्षात कंगना यांनी अनेकदा उघडपणे याविषयी भाष्य केले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगना यांनी ‘आता राजकारणात उतरण्यासाठी ही योग्य वेळ आहे’, म्हटले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर महत्त्वाचा पालट !

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेला येणार्‍या रस्त्यावर नवीन बोगदा झाला असल्याने मार्गात पालट करण्यात आला आहे. घाट उतरतांना पूर्वी खोपोलीतून बाहेर जाण्यासाठी डाव्या बाजूने उतरावे लागत होते, तर मुंबईला येण्यासाठी उजव्या बाजूची मार्गिका होती. आता नेमके उलटे करण्यात आले आहे. मुंबईला येण्यासाठी डाव्या, तर खोपोली जाण्यासाठी उजव्या बाजूने जावे लागत आहे.

नीलेश राणे यांच्यावर थकबाकी प्रकरणी महापालिकेची कारवाई

नीलेश राणे

पुणे – भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, माजी खासदार नीलेश राणे यांनी ‘आर् डेक्कन मॉल’ची साडेतीन कोटी रुपयांची मिळकत थकवल्याच्या प्रकरणी महापालिकेने नीलेश राणे यांना नोटीस बजावली होती. महापालिकेच्या कर संकलन विभागाने या मॉलचे वरचे २ मजले सील केले आहेत. महापालिकेने नोटिसा दिल्यानंतर प्रत्येक वेळी पालिकेवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.