मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड !

 

प्रतिकात्मक छायाचित्रं

मुंबई – कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी, तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले आहे. या संदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. कार्यालयीन कर्मचार्‍यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ‘ई ऑफिस’प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात.

संपादकीय भूमिका 

मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातही फसवणूक करायला गुन्हेगारांना भय वाटत नाही, तिथे सामान्य लोकांच्या संदर्भात काय होत असेल ? अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?