स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धर्म आणि अध्यात्म यासंबंधीचे विचार !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी योगशास्त्राचा अभ्यास केला होता. कुंडलिनी जागृतीची अनुभूती घेतली होती. हिंदु महासभेच्या ध्वजावर त्यांनीच ‘कुंडलिनी’ अंकित केली होती. मोठेपणी सगुण मूर्तीपूजेत सावरकर यांनी रस दाखवला नसला, तरी ते नास्तिक नव्हते.