रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. अधिवक्ता आलोक तिवारी (उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती), प्रतापगड, उत्तरप्रदेश.

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून माझ्या मनाला शांती मिळाली.

आ. ‘माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, असे मला जाणवले.

इ. सर्व साधकांचे ज्ञान आणि सेवाभाव पाहून माझे हृदय प्रफुल्लित झाले.’

२. श्री. अरुण कुमार मौर्य (महासचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषद) शिवपूर, वाराणसी, उत्तरप्रदेश.

अ. ‘आश्रमातील साधकांद्वारे केली जाणारी सेवा अद्वितीय आणि अद्भुत आहे. ‘आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, याची मला जाणीव झाली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १८.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक