पुढील शैक्षणिक वर्षापासून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा धडा ११ वीच्या शालेय इतिहासात समाविष्ट !
पुणे – बाणेर येथील श्री. अतुल आवटे यांची पुतणी, त्रिशा आवटे ही अमेरिकेतील ‘मॅडिसन स्टेट’मधील ‘वेस्ट हायस्कूल’मध्ये ११ वीमध्ये शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबावर असलेला एक धडा वर्गामध्ये शिकवला जात होता. त्यात औरंगजेब किती सर्वश्रेष्ठ होता, याविषयी लिहलेले आहे, ते शिकवले जात होते. त्यावेळेस त्रिशाने धाडस करून वर्गामध्ये शिक्षकांना सांगितले, ‘‘हे खरे नाही, हा खोटा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते.’’ शिवरायांविषयी सगळा खरा इतिहास तिने वर्गात सांगितला. अलेक्झांडरच्या कथा ऐकून वाढलेल्या अमेरिकन मुलांना शिवरायांचा हा धाडसी इतिहास रोमांचित करून गेला. शिक्षकांनाही हा इतिहास नवा होता; पण रंजक वाटला. त्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पुष्कळ वाचन केले आणि सर्व माहिती मिळवली. याच्या परिणामामुळे त्या शाळेमध्ये पुढील वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर संपूर्ण एक धडा समाविष्ट केला जाणार आहे. जेणे करून तेथील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते, हे कळावे. त्रिशाने केलेले हे धाडस अभिमानास्पद आहे