भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन !

अखंड भारताचे स्वप्न पहाणार्‍या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे, हे आनंददायी आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित झाल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त पदाच्या नियुक्तीसाठी आळंदी देवस्थानची प्रक्रिया चालू !

संस्थान कमिटी, आळंदीचे पदसिद्ध अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे हे आहेत. त्यांच्याकडे कुणीही अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचेही या नोटिशीमध्ये म्हटले आहे.

अधिकोषाकडे भूमी गहाण ठेवून फसवणूक करणार्‍या संचालकांसह अधिकोषाच्या अधिकार्‍यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

‘मे. अमित एंटरप्रायजेस दि इंडियन हौसिंग लि.’च्या सर्व संचालकांसह अधिकोषाच्या अधिकार्‍यांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय : …अन्यथा पाकिस्तानात जा !

मुसलमानांनी कट्टरपणे  वागण्याऐवजी काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकाराणे हेच शहाणपणाचे !

आजरा (कोल्हापूर) येथील रवळनाथ मंदिराच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत ! – प्रकाश आबीटकर, आमदार, शिवसेना

७०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या आणि आजरा शहरासह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रवळनाथ देवालयाच्या नूतन बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परभणी येथे तरुणीवर अत्याचार करणार्‍यावर पोलिसांकडून गुन्हा नोंद !

विवाहाचे आमीष दाखवत २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करणार्‍यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्याने तरुणीला मारहाणही केली होती. आरोपीचे नाव अनिकेत अग्रवाल असे आहे.

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

‘जर अयोध्येत जाऊन श्री रामललाचे दर्शन घेतले, तर आमच्यावर आक्रमणे होतील’, अशी भीती बांगलादेशातील हिंदूंनी व्यक्त केली आहे. बांगलादेशात काही दिवसांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी हिंदूंवर आक्रमणे झाली होती.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. धर्मशिक्षणाविषयी पुष्कळ काही शिकायला मिळाले. येथील अनुशासन पहायला मिळाले. साधकांची सेवा पाहून खरोखर मनाला शांती मिळाली.’ 

श्रीरामजन्मभूमीतील ८ मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि जनसुविधा केंद्राची निर्मिती !

अयोध्यानगरीत श्रीरामजन्मभूमीमध्ये प्रभु श्रीरामाच्या मंदिरासह अन्यही काही मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयीसुविधांचे कामही युद्धपातळीवर चालू आहे.

महाभारताचा एक शास्त्र म्हणूनही अभ्यास करणे अत्यंत आवश्यक !

‘भगवान श्रीकृष्णाने युद्धसमयी अर्जुनास सांगितलेली गीता आणि भीष्माने मृत्यूशय्येवर असतांना युधिष्ठिरास केलेले विष्णुसहस्रनामाचे निरूपण स्वतःचा उत्कर्ष आधार देणारी दोन विधाने आहेत.