संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त पदाच्या नियुक्तीसाठी आळंदी देवस्थानची प्रक्रिया चालू !

आळंदी (जिल्हा पुणे) – संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या रिक्त होत असलेल्या ३ विश्वस्त जागांसाठी निवड प्रक्रिया देवस्थानने चालू केली आहे. तसेच यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र उमाप यांनी याविषयी नोटीस काढली आहे.

१५ दिवसांच्या आत इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत. संस्थान कमिटी, आळंदीचे पदसिद्ध अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे हे आहेत. त्यांच्याकडे कुणीही अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचेही या नोटिशीमध्ये म्हटले आहे.