भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन !

‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित !

मुंबई – अखंड भारताचे स्वप्न पहाणार्‍या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे, हे आनंददायी आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित झाल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा ‘भारतरत्न’ जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. ‘त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.