रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. दिलीप बहिरम (सहसचिव, श्री मंगळग्रह सेवा संस्था), अमळनेर, जिल्हा जळगाव.

अ. ‘आश्रम पाहून समाधान वाटले. आश्रमातील स्वच्छता, शांतता आणि नम्रता या सर्व गोष्टींमुळे मन अगदी भारावून गेले.’

२. श्री. संजय ठाकूर (संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र जागृती मंच), अकोला, महाराष्ट्र.

अ. ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याची अनुभूती आली.

आ. माझे मन शांत आणि स्थिर जाणवले.

इ. प्राणशक्ती वाढल्यासारखी जाणवली.’

३. श्री. रमेश किसनराव पांडे (अध्यक्ष, श्री जगदंबा माता आणि झिंगराजी महाराज संस्थान), अमरावती

अ. ‘आश्रम पाहून आध्यात्मिक आनंदाची अनुभूती आली. अंतरंगात शांतीच्या लहरी निर्माण झाल्या. सर्व साधकांकडून प्रेम मिळाले. संतांशी झालेल्या संवादामुळे एक प्रकारचा स्वर्गीय आनंद मिळाला.’

४. श्री. वासुदेव हरीदास राठोड (जिल्हा सहसमन्वयक, अखिल विश्व गायत्री परिवार), चंद्रपूर

अ. आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. धर्मशिक्षणाविषयी पुष्कळ काही शिकायला मिळाले. येथील अनुशासन पहायला मिळाले. साधकांची सेवा पाहून खरोखर मनाला शांती मिळाली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १७.६.२०२३)