‘भगवान श्रीकृष्णाने युद्धसमयी अर्जुनास सांगितलेली गीता आणि भीष्माने मृत्यूशय्येवर असतांना युधिष्ठिरास केलेले विष्णुसहस्रनामाचे निरूपण स्वतःचा उत्कर्ष आधार देणारी दोन विधाने आहेत. विष्णुसहस्रनाम सृष्टीच्या अस्तित्वामागचे रहस्य सांगते, तर भगवद्गीता व्यवहारज्ञान शिकवते. भूतकाळ हाच भविष्यकाळाचा आधार असतो. महाभारत हा जर महर्षि व्यासांनी सांगितल्याप्रमाणे इतिहास असेल, तर त्यातही काही भविष्यकाळाची पावले शोधणे अवघड जाणार नाही; म्हणून महाभारताकडे एका धर्मग्रंथासह एक शास्त्र म्हणूनही त्या दृष्टीकोनातून त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. कलियुगाच्या अंतकाळी समाज कोणत्या स्तरावर पोचणार आहे, याचे २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी बांधलेले अंदाज आणि आजची परिस्थिती यांचे विलक्षण साम्य वरील विधानास किती पोषक आहे, हे स्पष्ट लक्षात येईल.’
– एक धर्मप्रेमी