आजरा (कोल्हापूर) येथील रवळनाथ मंदिराच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत ! – प्रकाश आबीटकर, आमदार, शिवसेना

श्री रवळनाथ देवाची मूर्ती

कोल्हापूर – ७०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या आणि आजरा शहरासह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रवळनाथ देवालयाच्या नूतन बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, हे मंदिर पूर्वी लाकडी आणि दगडी स्वरूपाचे होते. वर्ष १९८२ मध्ये शहरातील नागरिकांनी याचा जिर्णाेद्धार केला. मंदिराच्या भोवताली भावेश्वरी, पालवेर, महादेव मंदिर, श्री गणेश मंदिर अशी अन्य मुख्य देवस्थाने आहेत. या देवस्थानच्या यात्रा, तसेच रथोत्सवाला लाखोंच्या संख्येने भक्त येतात.

श्री रवळनाथ देवाची मूर्ती

श्री रवळनाथची मुख्य यात्रा असते, त्या वेळी १० दिवस भरगच्च कार्यक्रम असतो. या मंदिराचा जिर्णाेद्धार करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दगडी बांधकामासाठी ५ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.