कल्याण येथे श्रीरामाच्या गाण्यात पालट करणार्‍या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !

कल्याण येथील बारावे गावातील एका धर्मांधाने प्रभु श्रीरामावर सिद्ध केलेल्या गाण्यात हिंदूंच्या भावना दुखावतील असे शब्द घालून त्यात पालट केला आणि ते गाणे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले.

नागपूर येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु मुलांवर मुसलमानबहुल परिसरातून जातांना चप्पलफेक आणि मारहाण !

२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असतांनाच येथील मोमीनपुरा परिसरातून काही हिंदु मुले ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत जात होती. तेव्हा तेथील प्रार्थनास्थळातून त्यांना चप्पल फेकून मारण्यात आली.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’स उत्स्फूर्त प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.

वसईत लोकलच्या धडकेत ३ रेल्वे कर्मचार्‍यांचा मृत्यू !

रेल्वेच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम ते तिघे करत असतांना ही घटना घडली.

पुणे येथे धर्मांधाकडून कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न !

एका धर्मांधाच्या आक्रमकतेला विरोध न करणारे आणि बघ्याची भूमिका घेणारे हिंदू धर्मांधांच्या समुहाचा कधी सामना करू शकतील का ?

पुणे येथे लाच स्वीकारतांना अधिवक्त्यासह पोलीस उपनिरीक्षकास अटक !

जनतेचे रक्षणकर्तेच भ्रष्टाचार करत असतील, तर कायद्याचे राज्य कसे येणार ? अशांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !

पुणे येथे राज्यातील पहिले स्वतंत्र पॉक्सो न्यायालय !

प्रस्तावित नव्या स्वतंत्र इमारतीमुळे पॉक्सोतील खटले जलद निकाली निघण्यास मोठे साहाय्य होईल, तसेच बालस्नेही सुविधांमुळे साक्षीदारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, असे फौजदारी वकील अधिवक्ता गणेश माने यांनी सांगितले.

निगडी (पुणे) येथून ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

अशी थोड्या थोड्या बांगलादेशींनी अटक करण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवूनच हा प्रश्न सोडवायला हवा !

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले