नागपूर येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु मुलांवर मुसलमानबहुल परिसरातून जातांना चप्पलफेक आणि मारहाण !

पोलिसांनी आरोपींवर गुन्हे नोंदवून त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा घेतला पाहिजे !

नागपूर – २२ जानेवारी या दिवशी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असतांनाच येथील मोमीनपुरा परिसरातून काही हिंदु मुले ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत जात होती. तेव्हा तेथील प्रार्थनास्थळातून त्यांना चप्पल फेकून मारण्यात आली. छोटी खदानमधील हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी ही हिंदु मुले चालली होती. तिथून भगवाघर चौकात जातांना वाटेत मोमीनपुरा भागात वरील घटना घडली.

त्यानंतर मुलांनी तेथेच थांबून परिसरातील लोकांना जाब विचारायला आरंभ केल्यावर तिथे ३० हून अधिक धर्मांध मुसलमान जमले. त्यांनी १४ वर्षीय हिंदु मुलाला पुष्कळ प्रमाणात मारहाण केली. घायाळ मुलाला अन्य मुले भगवाघर चौकात घेऊन गेली. त्यानंतर शेकडो हिंदु भगवाघर चौकात जमा झाले. ते मोमीनपुरा भागाकडे जायला निघाले. यानंतर मध्य नागपुरात प्रचंड तणाव निर्माण झाला. २ घंट्यांहून अधिक काळ या भागात पुष्कळ तणावाची स्थिती होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. मोमीनपुरा परिसरात तातडीने शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, तसेच सशस्त्र पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला. काही वेळाने पोलिसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे शांतता राखण्याचे आवाहन केले.