गोवा येथून पारपत्र काढल्याचे उघडकीस !
पुणे – येथे अवैध वास्तव्य करणार्या ५ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेचे आतंकवादविरोधी पथक आणि निगडी पोलीस यांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ३ आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे गोवा येथून पारपत्र (पासपोर्ट) काढून घेतले आहे. अन्य २ पारपत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया चालू होती. (या बांगलादेशींना बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्यांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
हे आरोपी बांगलादेशी असून त्यांनी बंगाल येथील सिलीगुडी येथे बनावट जन्मदाखला आणि अन्य कागदपत्रांद्वारे आधारकार्ड सिद्ध केले. त्यानंतर सर्वजण निगडी येथील साईनाथनगर येथील चाळीत रहात होते. या ठिकाणी त्यांनी आधारकार्डावरील जुना पत्ता पालटून पुण्यातील पत्याची नोंदणी केली. याविषयी आतंकवादविरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी धाड टाकून ५ आरोपींना अटक केली आहे. निगडी, भोसरी, चिखली आणि महाळुंगे परिसरातून आतापर्यंत १४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यात ६ महिलांचा समावेश आहे. (नागरिकांनो, स्वत:च्या परिसरामध्ये असे अनोळखी कुणी रहात असल्यास त्याविषयी तात्काळ पोलिसांना संपर्क करा ! – संपादक)
संपादकीय भूमिका :अशी थोड्या थोड्या बांगलादेशींनी अटक करण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवूनच हा प्रश्न सोडवायला हवा ! |