अमरावती – शहरातील योगीराजनगर तपोवन परिसर येथे मनपाद्वारे ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत बांधलेल्या गोदावरी हाऊसिंग सोसायटी या इमारतीला वीजपुरवठा करणार्या ‘डीपी’चा वीजपुरवठा बंद करून कंत्राटदाराने सील लावले. या इमारतीच्या कंत्राटदाराने संबंधित कंत्राटदाराला पैसे न दिल्याने डीपीचा विद्युत् पुरवठा कापून त्याने त्यावर नोटीस लावली. या गृहसंकुलात १०० लाभार्थी परिवाराचे निवास आहेत. त्यांचा वीजपुरवठा यामुळे बंद झाला आहे. महानगरपालिकेकडूनही त्यांना कुठलेच सहकार्य मिळत नाही. या प्रकरणी महानगरपालिका, महावितरण यांच्या भूमिका याविषयी नागरिकांत प्रचंड आक्रोश आहे. (२ कंत्राटदारांच्या वादात नागरिकांची हानी होत आहे, त्याचे काय ? – संपादक)