आर्णी आणि कारंजा (लाड) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
आर्णी – भारतीय सुरक्षाव्यवस्थेला धोका निर्माण करणारी, तसेच केंद्रशासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था भारतात राबवली जात आहे. या अनधिकृत हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेश सरकारने बंदी आणली आहे. त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्य-मांस मुक्त करावी, या मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आर्णी येथील उपविभागीय अधिकारी श्री. गोपाळ देशपांडे यांना देण्यात आले.
या वेळी कारंजा (लाड), वाशिम येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री. दिलीप दवंडे, श्रीराम व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. अमोल अघम, बजरंग दलाचे प्रखंड संयोजक श्री. दीपक फड, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत फुलाडी, मनोज फुलारी, श्याम इंगळे, प्रदीप धाये, बंटीकुमार चव्हाण आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.