Conversion Of Hindus : राज्यामध्ये ‘धर्मांतर बंदी कायद्या’विषयी सरकार गंभीर ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री

विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासी यांचे धर्मांतर करणार्‍यांना जरब बसवू. बळजोरीने धर्मांतर केल्याची तक्रार आल्यास सरकार कारवाई करेल.

‘मे. रोडवेज इंडिया इंफ्रा लि.’ या आस्थापनाला काळ्या सूचीमध्ये टाकता येत नाही – उदय सामंत, उद्योगमंत्री

‘मे. रोडवेज इंडिया इंफ्रा लि.’ या आस्थापनाची निविदा कोणत्या कारणांनी रहित करण्यात आली, त्याचे नियम पाहू.

अतिरेकी कारवायांत सहभागी असणार्‍या काँग्रेसच्या पदाधिकार्‍याच्या अन्वेषणाची विधानसभेत मागणी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरीवली येथे धाडी टाकून १५ हून अधिक अतिरेक्यांना अटक केली. यामध्ये अटक करण्यात आलेला फारान्स हुसे हा उपसरपंच असून काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा पदाधिकारी आहे.

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या जी.एस्.टी. अधिकार्‍यासह ५ जणांना अटक !

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स आस्थापनाच्या मुख्य आरोपीसह ९ जणांविरुद्ध १२ डिसेंबर या दिवशी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर आस्थापनाचा प्रमोटर असलेल्या जी.एस्.टी. अधिकार्‍यांसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठलाच्या प्रसादाचे लाडू निकृष्ट !

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचा लाडवाचा प्रसाद हा निकृष्ट असल्याचा अहवाल लेखापरीक्षणात नोंदवण्यात आला आहे.

ठाकुर्ली (डोंबिवली) येथे महिला पोलीस हवालदाराला घायाळ करण्याचा दुचाकीस्वाराचा प्रयत्न !

ठाकुर्ली (पूर्व) येथील रेल्वेस्थानक भागातील हनुमान मंदिर-चोळे रस्त्यावर पोलीस हवालदार रेणुका राठोड या वाहतूक नियोजनाचे काम करत होत्या. १२ डिसेंबरला सकाळी भरधाव असलेल्या एका दुचाकीस्वाराला त्यांनी रोखले असता त्याने दुचाकी वेगाने पुढे नेली.

धर्मकार्य करण्याचे अलौकिक महत्त्व !

‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जेव्हा अटक करण्यात आली, तेव्हा त्यांना मारहाण झाल्याचे पंचनाम्यात नमूद नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

डॉ. तावडे यांना अटक करण्यात आल्यावर त्या प्रसंगी उपस्थित असणारे पंच विजय सपकाळ यांची साक्ष सरकार पक्षाच्या वतीने १३ डिसेंबरला नोंदवण्यात आली. त्या प्रसंगी उलटतपासणी घेतांना अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयात हे निदर्शनास आणून दिले.

‘हलाल’च्या उत्पादनांवर बंदी घालण्याच्या प्रश्नावर आमदार अबू आझमी नरमले !

आझमी यांचे विधान पहाता इतिहासात झालेल्या चुका सुधारणे आणि त्याद्वारे आपला गौरवशाली भूतकाळ परत मिळवणे, हे आपले कर्तव्य आहे, ते प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यावे !

संपादकीय : ‘कडेकोट’ सुरक्षेचा कडेलोट !

स्वराज्याचे रक्षण कसे करावे ? याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श भारतीय शासनकर्ते कधी अंगीकारणार ?