‘हलाल’च्या उत्पादनांवर बंदी घालण्याच्या प्रश्नावर आमदार अबू आझमी नरमले !

अबू आझमी यांनी हिंदूंना ‘घुबड’ संबोधून उर्दू शायरीत ‘हलाल’ प्रश्नावर उत्तर दिले !

अबू आझमी

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – विधानभवनात १३ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्यात ‘हलाल’ उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मागणीविषयी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी उर्दू शायरीत उत्तर देतांना हिंदूंना ‘घुबड’  असे संबोधून काढता पाय घेतला. हा प्रश्न विचारला असता आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख दोघेही नरमले होते. त्यांना ‘हलाल’च्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देता आले नाही.

‘उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘हलाल’ उत्पादनांवर त्वरित बंदी घालण्यात यावी’, या प्रमुख मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, प्रताप सरनाईक, संतोष बांगर, बालाजी कल्याणकर आणि प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची १२ डिसेंबर या दिवशी भेट घेतली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हलाल उत्पादनांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

या पार्श्वभूमीवर १३ डिसेंबर या दिवशी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलतांना एका पत्रकाराने त्यांना ‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हलाल उत्पादनांवर बंदी घालावी’, अशी मागणी केली होती. त्यावर ‘आपली प्रतिक्रिया काय ?’ असा प्रश्न विचारला, तेव्हा अबू आझमी यांनी उर्दू शायरीत ‘बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम-ए-गुलिस्ता क्या होगा ।’ असे उत्तर देऊन ते तडक निघून गेले. याचा अर्थ ‘बाग उद्ध्वस्त करण्यासाठी एक घुबड पुरेसे असते. आता तर प्रत्येक फांदीवर घुबड बसले आहे, तर त्या बागेची काय अवस्था होईल ?’, असे आहे.

संपादकीय भूमिका 

  • सरकारची अनुमती नसतांनाही अवैध हलाल प्रमाणपत्र देऊन त्याद्वारे आतंकवादाला साहाय्य केले जात आहे ! काश्मीरसह भारताला उद्ध्वस्त करणार्‍या आतंकवादाला पाठिंबा देणार्‍या अवैध प्रमाणपत्राला मौलानांसह अबू आझमींसारखे नेते प्रोत्साहित करत असतील, तर खरे ‘घुबड’ कोण आहेत, हे जनताच ठरवेल !
  • आझमी यांचे विधान पहाता इतिहासात झालेल्या चुका सुधारणे आणि त्याद्वारे आपला गौरवशाली भूतकाळ परत मिळवणे, हे आपले कर्तव्य आहे, ते प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यावे !