राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या हाती !
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक हे नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात; मात्र नगरसेवकच नसल्याने नागरिकांनी त्यांचे प्रश्न आता मांडायचे कुणाकडे ? आणि ते सोडवायचे कसे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक प्रभागांमध्ये स्वच्छता, भटकी कुत्री, पाणी, जन्म-मृत्यूचे दाखले यांसह दैनंदिन समस्या आता सोडवण्यासाठी किंवा वाचा फोडण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी कुणीच नसल्याने नागरिक हतबल आहेत !